रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीने
रविवार दि ५ एप्रिल रोजी कॅन्सर वेदना मुक्ती, चष्म्यापासून कायमची मुक्तता इत्यादी आजारावर मोफत तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन

फलटण( वार्ताहर)- रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीने डॉ. बारकीज होमिओपॅथिक ईश्वरपूर {इस्लामपूर }यांच्या सहकार्याने कॅन्सर वेदना मुक्ती,चष्म्यापासून कायमची मुक्तता,जुनाट सर्दी,दमा, खोकला व सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शन वर रवि. दि.5 एप्रिल रोजी मोफत उपचार व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता नामदेवराव सूर्यवंशी {बेडके} महाविद्यालय फलटण येथे सदरचे शिबिर होणार असून या शिबिरामध्ये कॅन्सर पासून होणाऱ्या तीव्र वेदनावर मोफत औषधे देण्यात येणार असून या औषधाने रुग्णाला दोन दिवसात फरक पडतो. चष्म्यापासून मुक्तता या शिबिरामध्ये ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्म्यापासून कायमची मुक्तता मिळणार असून डोळ्यांचे सर्व आजार मोतीबिंदू, काचबिंदू यावर मोफत औषधे दिली जाणार आहेत .

सर्दी, दमा, खोकला या मध्ये जुनाट सर्दी,वारंवार कफ होणे,खोकला, धाप लागणे यावर मोफत औषध दिले जाणार आहे. त्वचा विकार फंगल इन्फेक्शन यामध्ये सर्व प्रकारच्या त्वचा विकारावर औषधे देण्यात येणार आहे.
सदरचे शिबिर पूर्णपणे मोफत असून तपासणीनंतर मोफत औषधे दिली जाणार आहेत.

सदरच्या शिबिरासाठी 31 मार्च 2026 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक असून पूर्व नाव नोंदणी नसेल तर ऐनवेळी प्रवेश दिला जाणार नाही.

या शिबिरासाठी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण,हॉटेल ब्रह्मा प्युअर व्हेज फलटण व सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांचे सहकार्य लाभले आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी
9860004730, 7875591570,9890043600,940535177,8600392444,9890016663,9860461008,9881452008,7757006050,8010239062,9822001231,9766000320,9226720881,9284274913,7020467682,9420999917,8668336313,9075156519,7498618183,9423262314
यावर त्वरित संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!