कै. माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी…


शिक्षण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व…कै. माधवराव पाटील         
(मुरुम प्रतिनिधी)

कै. माधवराव पाटील यांनी शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांनी विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. समाजकारणाबरोबरच राजकीय क्षेत्रात त्यांनी पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्व केले. ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरु मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची रामनवमी दिनी १०० वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.२६) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशिद शेख, मदन पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सादिकमिया काझी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे, कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. राम सोलंकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य डॉ. सदक वली, मुख्याध्यापक उल्हास घुरेघुरे, राजशेखर कोरे, अनुराधा जोशी, व्यंकट घोडके, सैपन शेख, धनराज खोंडे, श्रीपाद कुलकर्णी, कमलाकर मोटे, सच्चिदानंद अंबर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना आदि ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.   
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील पाटील महाविद्यालयात कै. माधवराव पाटील यांच्या जयंती प्रसंगी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, सादिकमिया काझी, व्यंकट जाधव, दिलीप गरुड आदि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
अपहरण झालेल्या व्यक्तीने आरोपीला घेऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात दिली धडक    |    माण-खटाव वाचवा: भ्रष्टाचार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सर्वांगीण विकासासाठी आमरण उपोषणाचा इशारा    |    सूरज दादा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर निवड;मायणीत जल्लोष!    |    पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!