गोंदवले प्रतिनिधी दिनांक 22 मार्च 2025 वार रविवार रोजी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचे ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन लक्ष्मी नारायण मंगल सभागृह,मंगळवार पेठ, सातारा येथे संपन्न झाले. मा.नामदार सौ.मेघनाताई बोर्डीकर राज्य मंत्री ऊर्जा, महिला व बालविकास यांची प्रमुख उपस्थिती होती. संगीता श्रीवास्तव अखिल भारतीय अंगणवाडी सचिव यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी प्रमुख 7 ठराव करण्यात आले. मागील 3 वर्षातील सरचिटणीस यांचा अहवाल वाचन करण्यात आले तसेच आर्थिक लेखाजोखा मांडण्यात आला. या अधिवेशनासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, पुणे जिल्ह्यातून ४०० हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.पुढील ३ वर्षांकरिता नवीन कार्यकारणी घोषित झाली.सौ स्मिता पानसे अध्यक्ष, सौ अनिता चव्हाण महामंत्री, नीता सूर्यवंशी संघटन मंत्री, श्री जयराम गायकवाड कोषाध्यक्ष व इतर 16 पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव Adv श्री अनिल जी धुमणे, केंद्रीय उद्योग प्रभारी Adv श्री श्रीपाद कुटासकर, अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य व प्रदेश संघटन मंत्री श्री बाळासाहेब भुजबळ ,भारतीय मजदूर संघ प्रदेश महामंत्री श्री किरण मिलगीर, अखिल भारतीय अंगणवाडी महासंघ उपाध्यक्ष सौ वनिता सावंत उपस्थित होते.सातारा जिल्हा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री सतिश सावंत, जिल्हा सचिव श्री रविंद्र माने, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शामराव गोळे, विभाग संघटक श्री राजेंद्र काळे यासह टीम सातारा जिल्ह्याने हे अधिवेशन यशस्वी केले. Post navigation कमळी अहिंसामध्ये, जंगी सत्काराने भारावून गेले – अभिनेत्री विजया बाबर दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!