#जलदाता
आज २२ मार्च. हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. पण माण व खटाव तालुक्यातील लाखो लोकांच्या आयुष्यात खरा जलदिन साजरा करण्याचे भाग्य आमदार धोंडीराम वाघमारे यांच्यामुळे मिळाले हे कदापि विसरून चालणार नाही.

वर्षानुवर्षे दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळलेल्या या दुर्लक्षित भागाचे भाग्य बदलण्याचे शिवधनुष्य माण – फलटण मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दिवंगत धोंडीरामजी वाघमारे यांनी लीलया पेलले व त्यांच्याच कार्यकाळात म्हणजे ११ फेब्रुवारी १९९७ साली भाजप – शिवसेना युतीच्या सरकारने उरमोडी – जीहे – कठापुर पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता दिली.

लहानपणापसूनच माण तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष प्रत्यक्ष अनुभवलेले असल्यामुळे१९९० साली प्रथमतःच आमदार म्हणून निवडून गेलेल्या आमदार धोंडीरामजी वाघमारे यांनी त्यांच्या आयुष्याचे लक्ष्य हे केवळ माणदेशात पाणी आणून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करणे हेच ठरविले होते. आणि केवळ त्यामुळेच पहिल्यांदा १९९० साली व त्यानंतर १९९५ साली समोरून चालून आलेल्या मंत्रिपदाला विनम्रपणे नकार देत माणदेशाच्या पाणीप्रश्र्नाला प्राधान्य दिले व मंत्रिपदापेक्षा मला माझा माण तालुका पाण्याने समृद्ध होवून सुजलाम सुफलाम झाल्याचे बघायचे आहे हे विधानसभेमध्ये अनेकदा ठणकावून सांगितले होते.

उरमोडी, जिहे कटापुरप्रमाणेच ढाकणीचा तलाव असो किंवा अनेक वर्षे रखडलेले आंधळीचे धरण… यासर्व योजना मार्गी लावण्याचे काम त्याकाळात वाघमारे दादांच्या माध्यमातून झाले याची जाणीव सर्वांनाच होती. आणि त्याचाच परिपाक म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव आंधळी धरणाचे जलपूजन वाघमारे दादांच्याच हस्ते करण्यात आले.

या सर्व मोठ्या योजना पूर्णत्वास आणण्यास कारणीभूत ठरलेल्या व आपल्या भागात पाणी आणण्यासाठी अविरत झटलेल्या धोंडीराम वाघमारे नामक आधुनिक भगीरथाचे स्मरण माण खटाव मधील नवीन पिढीने आयुष्यभर करावे ज्यातून त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

वरील योजनांप्रमाणेच अनेक नळपाणी योजना व अश्या अनेक योजनांचे जन्मदाता हे धोंडीरामजी वाघमारे हेच आहेत हे इथे जन्म घेतलेल्या नवीन पिढीला कळलेच पाहिजे. २५-३० वर्षांपूर्वी विशीत असणाऱ्या व आज वयाची पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक माणदेशी माणसाला याची निश्चितपणे माहिती व जाणीव आहेच व आता आपल्या पुढील पिढीला धोंडीराम वाघमारे यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची माहिती देणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे.

माण व खटाव तालुक्याचे खरे जलदाता धोंडीरामजी वाघमारे यांच्या या महान जलकार्याला आम्हां समस्त माण – खटाव वासियांकडून कोटी कोटी सलाम🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!