सोलापूर (प्रतिनिधी)—

सोलापुर जिल्ह्यातील मराठा नगरसेवकांचा सत्कार नुकताच करण्यात आला.

मराठा समाजातील मुलींचे हॉस्टेल उभारल्यास तमाम मावळ्यांच्या मुली तुम्हाला आशीर्वाद देतील. असे विचार सोशल मीडिया राज्य अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केले.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या मराठा नगरसेवकांचा सोलापूर जिल्हा सकल मराठा ट्रस्टच्यावतीने ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री ना. जयाभाऊ गोरे यांच्या हस्ते व राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात झाला.

महापौर विनायक कोंड्याल, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार व शशिकांत चव्हाण मराठा समाजाचे ज्येष्ठ धुरीण दिलीपभाऊ कोल्हे, चंद्रकांतदादा वानकर, राजनभाऊ जाधव आणि जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष इंद्रजितभाऊ पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयाभाऊंनी प्रस्तावित मुलींच्या हॉस्टेलच्या जागेबद्दल ठोस शब्द दिला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *