खटाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; वनिता दुबळे बिनविरोध सभापती, रेश्मा शेडगे उपसभापती

खटाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; वनिता दुबळे बिनविरोध सभापती, रेश्मा शेडगे उपसभापतीपदी विजयी

वडूज( विनोद लोहार यांजकडून)-

खटाव तालुक्यातील पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी वनिता दुबळे यांची बिनविरोध निवड झाली असून, उपसभापतीपदी रेश्मा शेडगे यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. या निवडणूक प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्वला गाडेकर यांनी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. यावेळी तहसीलदार माने तसेच गटविकास अधिकारी योगेश कदम उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सभापतीपदावरही आपला दावा मजबूत केला. आरक्षित सभापतीपदी भाजपने बाजी मारत कातरखटाव गणातील वनिता दुबळे या सभापतीपदी विराजमान झाल्या.

उपसभापती पदासाठी भाजपच्या रेश्मा शेडगे आणि राष्ट्रवादीचे संग्राम कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. हात उंचावून घेतलेल्या मतदानात रेश्मा शेडगे यांना ८ मते, तर संग्राम कदम यांना ६ मते मिळाली. यामुळे शेडगे यांची उपसभापतीपदी निवड निश्चित झाली.

नवीन सभापती वनिता दुबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाईल. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल.

उपसभापती रेश्मा शेडगे यांनीही सर्व सदस्यांना सोबत घेऊन पारदर्शक कारभार करत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यानंतर नूतन सभापती, उपसभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रियाताई शिंदे, सोनियाताई गोरे, धनंजय चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, विशाल बागल, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, नंदकुमार मोरे, जितेंद्र पवार, तालुका अध्यक्ष अनिल माळी, वडूज नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे तसेच सोमनाथ भोसले, शिवाजी शेडगे, धनंजय दुबळे, धनाजी दुबळे, सचिन दुबळे, संतोष दुबळे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, खटाव तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!