म्हसवड (वार्ताहर)–
आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे सुप्रसिद्ध लेखक सुनील दबडे यांच्या ” बनगी आणि बिरमुटं ” . या कथासंग्रहास राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे . साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण यांच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्कार दिला जातो . यावर्षी हा पुरस्कार सुनील दबडे यांच्या ” बनगी आणि बिरमुटं ” . या ग्रामीण कथासंग्रहास जाहीर झाला आहे .
३ डिसेंबर रोजी दहिवडी ता . माण जि . सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा स्पंदन साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दबडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे .
” बनगी आणि बिरमुटं ” . हा ग्रामीण कथासंग्रह बदलत्या माणदेशातील शेतकऱ्यांचे भिषण वास्तव मांडणारा कथासंग्रह आहे . वाचकांच्या काळजाला हात घालणाऱ्या या बहुचर्चित कथा संग्रहाला गेल्या वर्षभरात राज्यातल्या प्रतिष्ठेच्या पाच साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे .
सुनील दबडे यांची पाच पुस्तके प्रसिद्ध असून ” भुईकळा ” हे सहावे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे .
दबडे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत . त्यांनी शैक्षणिक , सामाजिक व साहित्य क्षेत्रांत केलेल्या कामांमुळे त्यांना राज्यातील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे .
दबडे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!