गोंदवले – विधी सेवा समिती सातारा अंतर्गत विधीसेवा समिती दहिवडी व म्हसवड यांचे सौजन्याने दिवड ता.माण येथील इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झालेसदर शिबिराचे उद्घाटन अँड राजेंद्र भागवत यांचे हस्ते झाले प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक कारंडे यु.जी.यानी केले अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्री गोरे सर होतेया शिबिरात अँड राजेंद्र भागवत यांनी संविधानाने दिलेली नागरिकांनी पाळावयची कर्तव्य याविषयी सविस्तर माहिती दिली, अँड सारिका कापसे यांनी सायबर क्राईम या विषयावर विस्तृत माहिती दिली, अँड माया जानकर यांनी सामोपचाराने कोर्टाच्या बाहेर वाद मिटविणे या सविस्तर माहिती दिली, अँड स्वाती कवितके-ढालपे यांनी बाल संरक्षण कायदा याविषयी विविध उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिलीशेवटी आभार प्राध्यापक कारंडे जे.यु.यानी मानलेसदर शिबिराला दिवड पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ व ज्युनिअर कॉलेजचे व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होतेछाया – विधी सेवा शिबिराचे उद्घाटन करताना अँड राजेंद्र भागवत विधीतज्ञ,व ग्रामस्थ Post navigation तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी माझे संविधान माझा स्वाभिमान अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था – नाशिक बैठक व भव्य मेळावा यशस्वीपणे संपन्न