तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी माझे संविधान माझा स्वाभिमान

सातारा प्रतिनिधी

तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी आयोजित 75 व्या अमृत महोत्सव संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान जन जागृती अभियान अंतर्गत भव्य दिव्य रांगोळी स्पर्धेचे दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मा.किशोर फाळके (सरपंच ग्रामपंचायत सातारारोड पाडळी) यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम क्रमांक कु सिध्दी देवरुखकर कला महाविद्यालय सातारा विषय :- न्याय स्वातंत्र्यता समता बंधुता आपल्या राष्ट्राची ओळख द्वितीय क्रमांक कु श्रेया जाधव जरंडेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सातारारोड पाडळी तृतीय क्रमांक कु अजाक्षी आवडे छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा विषय :- संविधान माझे अधिकार माझी जबाबदारी उत्तेजनार्थ कु.निखिल जाधव कला महाविद्यालय सातारा विषय :- डॉ बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार व सुनिता कांजिले व ओम नारकर प्रत्येक स्पर्धकांनी विषयाला अनुसरून उत्कृष्ट रांगोळी काढल्या बद्दल संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच विशेष उपस्थिती मा.डाॅ.संजय (माजी सरपंच ग्रामपंचायत सातारारोड पाडळी) मा.मायादेवी कांबळे (माजी सरपंच ग्रामपंचायत भिमनगर) मा.शितल फाळके (अध्यक्षा संस्कृती महिला मंडळ सातारारोड पाडळी) मा.विजया खरात जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना महिला आघाडी सातारा व कार्यक्रम संयोजक मा.श्रीकांत आवडे (अध्यक्ष) मा.सचिन आवडे (सचिव) मा.संदिप आवडे (खजिनदार) मा.चेतन आवडे (उपाध्यक्ष) मा.महेश आवडे (जिल्हा संघटक भारतीय कर्मचारी संघ सातारा) मा.काजोल आवडे ,सारिका आवडे, नालंदा आवडे (अध्यक्षा माता भिमाई स्वयंसहाय्यता बचत समुह सातारारोड पाडळी इ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *