मुंबई, दि. १५:- राज्याचे उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणा व आश्रयाने पत्रकारांच्या मुला – मुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला निवृत्त मुख्याध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांनी दहा हजार रुपयांचा निधी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ठोंगे उपळाई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक व्यंकटेश यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानला दहा हजार रुपयांची देणगी दिली. अ. भा. नाट्य परिषदेच्या बार्शी शाखेचे अध्यक्ष कवी सोमेश्वर घाणेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन अपसिंगकर व अनिल जोशी यांच्या उपस्थितीत बार्शी येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात व्यंकटेश कुलकर्णी यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दिपक नलावडे यांना देणगीचा धनादेश सुपूर्द केला. कुलकर्णी यांनी ना. चंद्रकांतदादा यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी चाललेल्या कार्याने प्रभावित होवून देणगी दिल्याचे सांगितले. त्यांच्या उत्स्फूर्त देणगी बद्दल दिपक नलावडे यांनी आभार मानले.
प्रतिष्ठानच्या वतीने आता पर्यंत पत्रकारांच्या मुला मुलींच्या शिक्षण व करिअरसाठी “चंद्रकांतदादा शिष्यवृत्ती” तसेच वैद्यकीय सेवेसाठी सुमारे सोळा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *