(मुरूम प्रतिनिधी) मुरूम ता.उमरगा येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२६-२७साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ सोहळा कारखाना कार्यस्थळावर आज रोजी माजी मंत्री, कारखान्याचे चेअरमन आ. बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. श्री. विठ्ठलसाई कारखान्याचे कामकाज मा.आ.श्री. बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून जवळपास १८००० हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने जास्तीतजास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चीत केले आहे. यासाठी पुरेशी ऊसतोड व वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याचा हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देण्यात येणार असून कोणाचाही ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. बसवराज पाटील यांनी यावेळेस दिली. कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री. सादीकसाहेब काझी, याप्रसंगी मा.श्री. बापुराव पाटील, अध्यक्ष नगर परिषद, मुरूम, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री. शरणजी पाटील तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री अँड. सुभाषराव राजोळे, केशवराव पवार, शरणप्पा पत्रिके, दिलीप पाटील, विठ्ठलराव बदोले, राजीव हेबळे, संगमेश्वर घाळे, माणिकराव राठोड, रामकृष्णपंत खरोसेकर, शब्बीर जमादार, अँड. संजय बिराजदार, दत्तु भालेराव, शिवलिंगप्पा माळी, शिवमुर्ती भांडेकर, अँड. विरसंगप्पा आळंगे, संतराम बिराजदार तसेच प्रकाश आष्टे, बलभिमराव पाटील, नानासाहेब पाटील, अँड. बाळासाहेब पाटील, ह.भ.प.शरद बिराजदार महाराज, ह.भ.प.अडागळे महाराज बोरीकर, रशिद शेख, राजु वाघमारे, रफिक तांबोळी, योगेश राठोड, प्रल्हाद काळे, रविंद्र चव्हाण, मल्लिनाथ दंडगे, अँड. विश्वनाथ बिराजदार, गोविंद पाटील, देवेंद्र कंटेकुरे, पप्पु सगर, अँड. स्वप्नील कारभारी, नागनाथ पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.एस.आर. गवसाणे, फॅक्टरी मॅनेजर राजेंद्र काळे व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार पत्रकार, हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते. Post navigation साताऱ्यात महायुतीच्या मेळाव्यात शिवसेनेने दिला बंडखोरांना पाठिंबा.