नाझरे येथील वीरभद्र मंदिरात कोळेकर महास्वामींचे आशीर्वचन… नाझरे प्रतिनिधीगुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती… गुरु केवळ ग्रंथाचे ज्ञान देणारे नसून जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात. संसार रुपी सागर पार करण्यासाठी गुरुचरणी श्रद्धा ठेवणे आणि गुरु सेवा करणे आवश्यक आहे व त्याचे औचित्य साधावे म्हणून नाझरे ता. सांगोला येथील वीरभद्र मंदिरात सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कोळेकर महास्वामींचे आशीर्वचन आयोजित केले आहे तरी शिवभक्त , गुरु भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वीर सेवा समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांनी केले आहे. Post navigation ही ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे सावित्रीमाई -श्री अंबिका देवी प्रभावती माता फलटण ची सुवर्ण कन्या ऋतुजा पिसाळ हिचा भव्य सत्कार