…

(अजित जगताप) सातारा दि: पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक दोन दिवसावर आली असताना साताऱ्यात शिवसेने पक्षाने महायुतीचे पदवीधर उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठिंबासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये शिवसेना उपनेते व स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिक्षक मतदार संघात महायुतीच्या उमेदवारा ऐवजी शिवसेना पुरस्कृत सचिन सानप या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. सातारा येथील भगवतेसाई हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला शिवसैनिकांनी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबत झालेला राडा व त्याच्या माध्यमातून होणारा दुजाभाव विसरून फक्त पदवीधर मतदार संघात महायुती सोबत राहण्याचा संकल्प केला. भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना शिवसेनेच्या प्रमुख वक्त्यांनी भाषणाद्वारे पाठिंबा असल्याचे एक मताने जाहीर केले. परंतु, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा जाणीवपूर्वक कोणीही उल्लेख केला नाही. उलट शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या पाठीशी शिवसेनेचा धनुष्यबाण कायम राहणार आहेत. त्यामुळे त्यांचे निवडणुकीतील विजयाचे पारडे जड झाले आहे. आता फक्त निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. असा ठाम विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत. शिवसैनिक हा आदेशावर चालतो. नेत्यांनी आदेश दिले की, निष्ठावंत शिवसैनिक त्याचे काटेकोरपणाने पालन करतात. एक घाव… दोन तुकडे.. हे शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे. हेच साताऱ्यातील शिवसेनेच्या मेळाव्याने पारदर्शकपणे दाखवून दिले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक एकवटलेले आहेत. सातारा जिल्हा पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुकीतील शिवसेनेचा पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला अपेक्षित नुसार पदवीधर मतदार संघातील महायुती भाजपचे डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. परंतु, शिक्षक मतदारसंघाबाबत शिवसैनिकांनी घेतलेल्या भूमिकेचा आदर राखण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवसेना मागासवर्गीय आघाडी जिल्हाप्रमुख अमोल पाटोळे, महिला आघाडीच्या सुलोचनाताई पवार, विद्याताई बर्गे, सुरज लोहार, विश्वंभर बाबर, रामभाऊ लाहोटी, संजय साळुंखे, वासुदेव माने, राजाभाऊ बर्गे , शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने शिवसेनेचे अस्तित्व दाखवून देण्यात आले. या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्ह्याचे शिवसेना नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिले. महायुती नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. तीन प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला. त्याचीच आम्ही अंमलबजावणी करत आहे. डॉ. स्मिता जाधव यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसैनिक सर्व पदवीधर मतदारांच्या संपर्कात आहे. दोन दिवसावर निवडणुका आल्या असल्या तरी शिवसैनिकांची निवडणुकीतील कामाची पद्धत ही वेगाने सुरू असते. विजय होऊनच थांबते. असे स्पष्ट केले. दरम्यान, महायुतीचे शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा नाम उल्लेख टाळून अनेक वक्त्यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात नव्हे तर सातारा- सांगली- सोलापूर- कोल्हापूर- पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदार संघातील आजी-माजी आमदार व सचिन सानप या तिरंगी लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. डॉ. स्मिता जाधव यांची शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी सदिच्छा भेट घडवून आणण्यात आली. त्याच वेळेला महायुतीचे पदवीधर उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना शिवसेनेचा पाठिंबा निश्चित झाला होता. आजच्या मेळाव्यामध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या सातारा शहरातील मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, काही शिवसेना पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी लक्षवेधी ठरली आहे. लवकरच त्यांनाही प्रचार यंत्रणेमध्ये सामील करून घेतले जाईल असे वरिष्ठ शिवसेना नेत्यांनी सांगितले. …………………….

..

. फोटो- सातारा येथील शिवसेनेच्या मेळाव्यात डॉक्टर स्मिता जाधव यांना व शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांना पाठिंबा देताना मान्यवर.. (छाया- अजित जगताप, सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *