फलटण वृत्तसेवा

आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी फलटण ची सुवर्ण कन्या कु.ऋतुजा दादासो पिसाळ हिचा सत्कार काळूबाई नगर नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव यांचे हस्ते करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्या वेळी काळूबाई नगर मधील सर्व महिला लहान मुले,मुली व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
गेली आठ दिवस झालेल्या लहान मुलांच्या स्पर्धा ,तसेच संगीत खुर्ची,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा यांचा बक्षीस समारंभ पार पडला काळूबाई नगर मधील नागरिकांनी नऊ दिवस दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल नगरसेवक श्री अशोकराव जाधव यांनी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे व नागरिकांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *