वृत्तपत्र विक्रेत्याच्या कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणी साठी सांगोल्यात तहसीलदारांना निवेदन सादर.. -अध्यक्ष रविराज शेटे मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर ही अंमलबजावणी नाही, विक्रेत्याच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर.. सांगोला प्रतिनिधीऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता जनतेपर्यंत ज्ञान आणि माहिती पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तसेच कोरोना काळात ही वृत्तपत्र विक्रेत्याचे योगदान मोठे आहे, परंतु वृत्तपत्र विक्रेत्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे व विक्रेत्याच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली परंतु प्रत्यक्ष कारवाई नाही व त्यामुळे कल्याणकारी महामंडळाची शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नावाने तयार केलेले निवेदन सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सांगोल्याचे नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांच्याकडे दिले व त्यांनी त्वरित शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन यावेळी दिले असे संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगितले.वृत्तपत्र विक्रेत्याचा कल्याणकारी महामंडळाचा प्रश्न महत्त्वाचा असून शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये व विक्रेत्याच्या संयमाची वाट न पाहता त्यांना न्याय देऊन त्वरित कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी असेही रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो, कल्याणकारी महामंडळाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशा घोषणाही देण्यात आल्या. सदर प्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य उत्तम चौगुले, सदस्य रवींद्र बोत्रे, भानुदास जाधव, जितेंद्र सावंत, रेवणसिद्ध नकाते, रफिक पठाण, सिताराम गेजगे, विकास बोत्रे, संतोष सोनार इत्यादी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार उत्तम चौगुले यांनी मानले. Post navigation माण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा हिंगणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. शिक्षक व पदवीधर उमेदवार राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले हेच दुर्दैव- अँड .वैभव मोरे- पाटील