मायणी प्रतिनिधी- आमदार धैर्यशिलदादा कदम यांच्या हस्ते विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लि., राजाचे कुर्ले यांच्या नियोजित जागेवर नवीन इमारतीचे भूमिपूजन व बांधकाम शुभारंभ तसेच सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांना सक्षम आणि दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या नवीन इमारतीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळून शेतकरी व सभासदांच्या हिताला निश्चितच बळ मिळणार आहे. राजाचे कुर्ले परिसराच्या विकासाला गती देत गावागावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका आमदार धैर्यशिलदादा कदम यांनी सातत्याने घेतली आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची ही वाटचाल अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आशुतोष माने, व्हा. चेअरमन धनाजी पाटील, संचालक मंडळ, पदाधिकारी व सर्व सभासदांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी डी. के. बापू, मा. नारायणदादा माने, संचालक रावसाहेब माने, उपसरपंच निलेश माने, प्रदीप माने, गोविंद माने, आबासो माने, बापुसो माने, बाळराजे भोसले, संग्राम माने (बाळा), संजय शेडगे, नाना गुरव, धनंजय माने, जगन्नाथ थोरवे, अनिल माने, आण्णा माने, मिलिंद माने, बबन माने, किशोर माने, सयाजी माने यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation सांगोल्यात दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना तातडीने करा ; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य -सभापती चेतनसिंह केदार-सावंत