सांगोल्यात दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना तातडीने करा ; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याआधी जागे व्हा ; विठ्ठल शिंदेंचे प्रशासनाला निवेदन सांगोला : पावसाअभावी सांगोला तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी आणि पशुपालकांसमोरील वाढते संकट लक्षात घेऊन सांगोला तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी केली आहे.याबाबत शिंदे यांनी नायब तहसीलदार,सांगोला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा, जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्याचा साठा व तो किती दिवस पुरेल याची लेखी माहिती जाहीर करावी, पाणीटंचाई असलेल्या गावांची तातडीने माहिती घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, तसेच आगामी काळातील संभाव्य पाणी व चारा संकटाचा विचार करून प्रशासनाने पूर्वतयारी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता, उपलब्ध आकडेवारी व प्रत्यक्ष परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या हातातील पिके गेल्यानंतर मदत करण्यापेक्षा संकट निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी भूमिका विठ्ठल शिंदे यांनी मांडली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष बाबासो लिगाडे उपस्थित होते. Post navigation उपनगराध्यक्ष नितीन उर्फ आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न मौजे राजाचे कुर्ले, येथील सोसायटीच्या जागेची भूमिपूजन व बांधकाम बांधकाम शुभारंभ आमदार धैर्यशील दादा कदम यांच्या हस्ते संपन्न