पंढरपूर:अभिनव विवेकानंद व विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वबंधुत्व दिन व्याख्यान समारंभ’ आणि ‘स्व. सौ. पुष्पावती शिवदास भिंगे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक वातावरणात पार पडला. हा सोहळा शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर २०२६) दुपारी ३ वाजता सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सौ. मैत्रेयी केसकर व श्री. दीपक इरकल सर यांच्या ‘शिकागो व्याख्यान अभिवाचनाने’ झाली. त्यानंतर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. बालकृष्णनजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत श्री. शशिकांत घाडगे सर यांनी केले, तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. सचिन लादे सर यांनी प्रास्ताविक मांडले, तर श्री. सुनील कोरे सर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.गुणवंत शिक्षकांचा गौरव:या सोहळ्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘स्व. सौ. पुष्पावती शिवदास भिंगे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला : उच्च शिक्षण स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राचार्य डॉ. कैलास करांडे (प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, माध्यमिक शिक्षण स्तरावरील पुरस्कार श्री. दीपक इरकल (सहशिक्षक, लोकमान्य विद्यालय, पंढरपूर) यांना तर प्राथमिक शिक्षण स्तरावरील पुरस्कार डॉ. सौ. मैत्रेयी केसकर (सहशिक्षिका, आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तीनही पुरस्कारार्थी यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा परिचय दृक श्राव्य माध्यमातून अत्यंत सुंदर करून दिला.पुरस्कारार्थींच्या वतीने प्रा. डॉ. कैलास करांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच डॉ. सौ. प्रिया भिंगे मॅडम यांनीही आपले विचार मांडले.या प्रसंगी ‘स्वामी विवेकानंदांचे विश्वव्यापी विचार’ या विषयावर बोलताना प्रमुख वक्त्ये मा. श्री. सचिन जगन्नाथ शिंदे (अभ्यासू वक्त्ये, लेखक व विचारवंत) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचे विचार हे मानवतेला जोडणारे आणि तरुणांना प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. या सोहळ्यास विवेकानंद केंद्राचे मार्गदर्शक मा. श्री. शिवदास धों. भिंगे (गुरुजी), विठाई संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री. सोमनाथ गायकवाड व सौ. कीर्तीताई मोरे मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीम. महानंदा डोंबाळे मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी ओहोळ, राम मोरे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सर, डॉ. प्रविदत्त वांगीकर सर, डॉ. महेश भिंगे सर, सुनील जगताप बाळकृष्ण डिंगरे, प्रवीण देशपांडे, संजय कुलकर्णी, रामेश्वर कोरे, कविता गायकवाड, अंजू सूनगार, ज्योतिर्लिंग गायकवाड, पार्थ गायकवाड, दिपाली सतपाल आदींनी परिश्रम घेतले. Post navigation जिल्हा परिषद राबवणार स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना; साताऱ्यात स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारणीसंदर्भात पाठपुरावा करु- खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे..