भाजपा, व महायुतीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारासह प्रभाग निहाय सर्व उमेदवारांच्या भव्य प्रचाराचा शुभारंभ

मंगळवेढा (वार्ताहर)—

मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.सुजाता ऊर्फ सुप्रिया अजित जगताप यांच्यासह भाजपा, महायुतीच्या प्रभाग निहाय सर्व उमेदवारांच्या भव्य प्रचाराचा शुभारंभ सोहळा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते, आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत मंगळवेढा शहरात करण्यात आला.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीत भरघोस मतदान करून भारतीय जनता पक्षासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच, मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी भाजप महायुतीच सक्षम पर्याय असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुती #भाजप #BJP #मंगळवेढा #नगरपरिषद #प्रचार

Jaykumar Gore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *