मनसे जिल्हाध्यक्षांचा पुढाकार; कामासाठी २० लाखांची तरतूद गोंदवले, ता. ४ : येथील शिवराज कॉलनीतील सांडपाणी व्यवस्थेचा गेल्या १६ वर्षांपासूनचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनासह समाधी मंदिर समितीनेही याप्रश्नी सकारात्मक पुढाकार घेतला असून, त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्चाची तरतूदही केली. वारंवार मागण्या करूनही प्रश्न सुटत नसल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या प्रश्नी समाधी मंदिर समितीच्या दालनात झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर विश्वस्तांसह प्रशासनाने शिवराज कॉलनीची पाहणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील, जयप्रकाश कट्टे, संजय माने, डॉ. राजेंद्र अवघडे, पंकज पाटील, अंगराज कट्टे, संदीप फडतरे, पोपट माने, श्री. बनसोडे, सागर कट्टे आदी उपस्थित होते.व्यवस्थेसाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येणार आहे. या रकमेपैकी १२ लाखांचा भार ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद सदस्या शीतल रणपिसे व पंचायत समिती सदस्या गौरी तुपे यांनी स्थानिक निधीतून उचलण्याची भूमिका घेतली, तरसमाधी मंदिर समितीने आठ लाख रुपये देण्यासह जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे गेल्या १६ वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर आता कायमस्वरूपी व ठोस तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.… …. अनेक वर्षांपासून शिवराज कॉलनीतील रहिवाशांची गटार व्यवस्थेबाबत मागणी होती. त्याच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला. समाधी मंदिर समिती व प्रशासनाच्या सहकार्याने आता हा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान आहे. धैर्यशील पाटील,जिल्हाध्यक्ष, मनसे… Post navigation कोकणातील गणेशोत्सवासाठी वाहतुक अडथळा दूर करण्याचे नियोजन- शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रदिप पोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…