सातारा (अनिल वीर यांजकडून) : गॅस बुकिंग करूनही चार चार दिवस ओटीपी आणि डीएसी नंबर येत नाहीत.त्यातून आलाच तर संबंधित डीलर आँलिंपिया गँस यांची गाडी १५ दिवस येत नाही.त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.काही काळावधींनंतर बुकींग आणि डीएसी नंबर कॅन्सल होत असतो.ऐन पावसाळ्यात गेले चार महिने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.प्रामुख्याने जेष्ट नागरीक व वृद्ध महिला यांची ससेहोलपट होत आहे. ग्रामीण भागात सध्या शेतातील कामाची लगबग सुरु आहे.इतर कंपनीच्या सिलेंडर गाड्या कराडला व शिरगाव येथून आठवड्यातून दोन वेळा हेळगाव पाडळी या विभागात येतात. परंतू आँलिंपिया गँस कडून इंण्डेण कंपनीची सेवा पुरविण्यात हालगर्जीपणा व अक्षम्य विलंब होत आहे. त्यामुळे सर्वच ग्राहक तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत.तेव्हा इंडेन कंपनीला सेवा वेळेवर देता येत नसेल तर त्या पुरवठा विभागाने इतर कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम (HP) अथवा,भारत गॅस या कंपनी डीलरकडे कनेक्शन ट्रान्सफर करावीत.अशी आग्रही मागणी पाडळी ग्रामस्थातर्फे भीमगर्जना सामाजिक विचारमंचचे प्रकाश वाघमारे (प्रदेश सचिव,वक्ता सेल विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश) यांनी केली आहे. फोटो : मोकळ्या टाक्यासमवेत ग्रामस्थ.(छाया-अनिल वीर) Post navigation श्री विठ्ठलसाईचे रोलर पुजन आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न आ. सुहास बाबर यांनी मायणी येथील तारळेकर परिवारास भेट देऊन सांत्वन केले.