कळंबी केंद्र समूहाची शिक्षण परिषद उत्साहात मायणी प्रतिनिधी——-पंचायत समिती खटावच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबी केंद्र समूहाची शिक्षण परिषद राजाचे कुरले येथील गिरजा शंकर हायस्कूल मध्ये उत्साहात पार पडली यावेळी शिष्यवृत्ती व एन एम एम एस परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी रद्दीतून ग्रंथालय या उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षण परिषदेच्या विषयानुसार नियमित बाबींचा आढावा, केंद्र समूहातील शिक्षकांचे विचार, अनुभव देवाणघेवाण ,अध्ययन निष्पत्ती व आशय आधारित मासिक नियोजन, पीएम, विद्या व्हिडिओ निर्मितीसाठी नवोपक्रम ,गुणवत्ता आधारित स्पर्धा परीक्षा तसेच डॉक्ट जयंत नारळीकर गणित विज्ञान उपक्रम आधी विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली शिक्षण परिषदेत आकर्षण ठरलेल्या रद्दीतून ग्रंथालय उपक्रमात टाकाऊ रद्दीतील उपयुक्त साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती रुजवण्यास मदत होणार आहे या उपक्रमाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध शैक्षणिक उपक्रमात वरील चर्चा, श्रीमती संगीता गायकवाड यांच्या हस्ते रद्दीतून ग्रंथालय या उपक्रमाचे उद्घाटन यामुळे शिक्षण परिषद प्रेरणादायी ठरली या कार्यक्रमास केंद्रप्रमुख धनाजी पवार साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय माने, शाळेचे मुख्याध्यापक गुरव सर, उपक्रमशील शिक्षक तसेच केंद्रसमूहातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते Post navigation शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा; शिवाजीराव खांडेकर यांच्या प्रयत्नांना यश युवकांच्या पाठपुराव्याला यश! खराडेवाडी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी; काँक्रिटीकरणाच्या कामाला आमदार सचिन पाटील यांच्याकडून निधी मंजूर