म्हसवड वार्ताहर –
माण तालुका शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदी सूर्यकांत दडस व सरचिटणीसपदी सुशील त्रिगुणे यांची सर्वानूमते निवड झाली .
माण तालुका शिक्षक समितीची त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली ,त्यामध्ये
शिक्षक नेते म्हणून रामदास जाधव,
तालुका नेते काशिनाथ तोरणे,कार्याध्यक्ष अजित हिंगे,कोषाध्यक्ष नवनाथ खरात, उपाध्यक्ष विनोद शिलवंत, सल्लागार
राजेंद्रकुमार कदम यांच्या निवडी सर्वानुमते झाल्या.
नूतन अध्यक्ष सूर्यकांत दडस व सरचिटणीस सुशील त्रिगुणे यांनी तन मन धन अर्पून समिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.नूतन तालुका कार्यकारणीचे राज्य शिक्षक नेते उदय शिंदे सातारा जिल्हा शिक्षक नेते विश्वंभर रणवरे सातारा जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष किरण यादव,सातारा जिल्हा सरचिटणीस संतोष घोडके ,माण ज्येष्ठ नेते शहाजी दडस, पोपट शेटे, रा,ज. जाधव, अंकुश शिंदे, तालुक्याचे शिक्षक नेते विजयकुमार चव्हाण, नंदकुमार तुपे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारचे चेअरमन विशाल कणसे, शिक्षक बँक संचालक विजय बनसोडे,नितीन काळे,कराड पाटण शिक्षक सोसायटी, संचालक एम. डी. दडस , माण तालुक्याचे माजी सरचिटणीस चंद्रकांत जाधव ,किशोर शेंडे,अशोक गोरे,महादेव महानवर,दिगंबर बामणे,यासह अनेक शिक्षक समितीप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *