( अजित जगताप)सातारा दि: 20.. शिक्षण उपसंचालक श्रीमती अरुणा यादव भुजबळ यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा) सातारा तालुक्यातील कोंडवे गावच्या श्रीमती अरुणा यादव- भुजबळ यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे.श्रीमती अरुणा यादव यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी , नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या शिक्षणाधिकारी, पुणे (विद्या प्राधिकरण) येथे साहाय्यक संचालक , राज्यस्तरीय करिअर मार्गदर्शन उपक्रमांमध्ये (युनिसेफ च्या भागीदारीत) महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांची उपसंचालक पदी पदोन्नती झालेले आहे.कोंडवे येथील संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व विविध संघटनेने तसंच शिक्षण विभागातील मान्यवरांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केलेले आहे. शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव ता. खंडाळा सातारा जिल्ह्यातील श्रीमती अरुणा यादव- भुजबळ यांनी शिक्षण उपसंचालक पदापर्यंत मजल मारली आहे. भविष्यात आणखीन उच्च पदस्थ पदावर त्या विराजमान होतील. असा विश्वास प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते श्री सिद्धेश्वर पुस्तके, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विशाल कणसे, संचालक संजीवन जगदाळे, माजी संचालक ज्ञानेश्वर कांबळे व शिक्षक दत्तात्रय वाघमारे, सौ. मीनाकुमारी वाघमारे, राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ सरचिटणीस संतोष भोजने व ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय (चर्नी रोड, मुंबई) किंवा शिक्षण संचालनालय (पुणे) यांच्या आस्थापना विभागातून हा अधिकृत कार्यभार स्विकारल्याचा आदेश मिळू शकतो. अशी अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे. Post navigation उमरगा जनता बॅकेला नवीन ईमारत,२४२ कोटीच्या ठेवी,उत्कृष्ट आँडीट वर्ग मिळवत प्रगतीचा चढता आलेख-चेअरमन शरण पाटील चिंचवडमध्ये एल. प्रो. स्कूल अन् तेज ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार! नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; उपोषणाचा इशारा