चळे (प्रतिनिधी):येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि श्रीकृष्ण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय पर्वाप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अश्वमेध IAS अकॅडमीच्या संस्थापक संचालिका प्रा. अश्विनी काळे उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु स्वामी विज्ञानांंद बहुउद्देशीय व शिक्षण प्रसारक मंडळ (चळे) चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बळीराम जालिंदर बनसोडे हे होते.या मंगलप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या प्रा. अश्विनी काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वातंत्र्यदिनाचा हा अमृतमयी काळ आपल्याला राष्ट्राप्रती निष्ठा आणि समर्पणाची आठवण करून देतो. आजच्या युवा पिढीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत पदार्पण करून देशसेवेचे व्रत अंगीकारले पाहिजे.”कार्यक्रमास बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत लक्ष्मण तांबे आणि श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा. श्री. नितीन अशोक बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८.०० वाजता संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जय हिंद आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी केले. Post navigation प्राचार्य डॉ अस्वले यांच्या AI अधारित सेंद्रिय शेती उत्पादन मार्केटिंग डिव्हाॅइस ला पेटंट. तडवळेत ग्रामसभेच्या तारखेवरून उत्सुकता: २२ ऑगस्टला ग्रामसभा घेण्याची युवाशक्तीची प्रशासकांकडे मागणी