स्वातंत्र्य व शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदाराविना मोफत गणवेश वाटप (अजित जगताप)कोरेगाव दि: राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कोरेगाव मतदार संघात तीन तालुके येतात. या ठिकाणी कागदोपत्री शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु त्यांच्याविना शिवसेनेचा वर्धापन दिन व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला. शिवसेनेचे कोरेगावचे नेते राजाभाऊ बर्गे यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम झाल्यामुळे खऱ्या अर्थाने कोरेगाव मतदार संघात नव्या गणवेशासोबतच नवी आशा पल्लवी झाली आहे.मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजाभाऊ बर्गे मित्र समूहाच्या वतीने कोरेगाव येथील श्री भैरवनाथ सभागृहामध्ये अंगणवाडीतील बालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वाक्य बालमनावर रुजवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे समजते.कोरेगाव तालुक्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे कोरेगावचे नेतेजाभाऊ बर्गे यांनी घोषणा केली होती. लवकरच अंगणवाडीच्या बालकांना मोफत गणवेश वाटप केला जाईल. त्या अर्थाने दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीच्या बालकांसाठी गणवेश खरेदी करून तो मोफत वितरित करण्यात आला. त्यावेळेला शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे व रामचंद्र बर्गे पांडुरंग सुतार उदयसिंह बर्गे सुनील बर्गे विकास बर्गे प्राध्यापक राजकुमार बर्गे संदीप कळसे नितीन बोतल जी बाळासाहेब बर्गे रंजीत भोसले यशवंत बर्गे राजेश डायमा सुरेश शिंदे रामभाऊ बर्गे निलेश घनवट यांच्यासह अंगणवाडी सेविका अशा सेविका व पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक तसेच अंगणवाडीमध्ये शिकणारी बालक उपस्थित होते. प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री संतोष नलावडे यांनी केले.शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सेना संपर्कप्रमुख शरद कणसे व सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण म्हणजे शब्द पाळणारा मान आहे. कोरेगाव मध्ये शिवसेनेचे आमदार पण काम करतात भाजपचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्याची सर्वत्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा गणवेश पोशाख म्हणजे परिवर्तनाची नांदी ठरली आहे. फोटो कोरेगाव येथील श्री भैरवनाथ अंगणवाडी बालकांना गणवेश वाटप करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, कोरेगाव) Post navigation सौ.सोनियाताई गोरे यांची अपघातग्रस्त महिलेला मदत… शेकडो वर्षांची परंपरा जपणारा रेडा गावचा सर्जेनाथ महाराजांचा भंडारा