मुंबई (परेल, प्रतिनिधी – अविनाश राऊत)परेल येथील ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’ मध्ये रंगभूमी, चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्भीड पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा ५५ वा वाढदिवस अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे सर्वेसर्वा श्री. रामजी डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, कार्यकारी निर्माते तथा साऊंड इंजिनिअर काफिल अन्सारी, प्रसिद्ध गायक तथा समाजसेवक डॉ. मंगेश पेडामकर, निलेश घाडी आणि प्रसिद्ध गायिका रुची पाटील यांच्या प्रेरणादायी सहकार्यातून हा सोहळा पार पडला. बॉलिवूडचे लोकप्रिय विनोदी अभिनेते कांचन पगारे, अविनाश राऊत, समस्त तेटांबे परिवार, गुरव परिवार, देवेंद्र पेडणेकर, तुषार भाऊ, मांजरेकर भाऊ, वरळी विभागीय प्रवक्ते श्री. मकरंद तासगांवकर परिवार आणि साकरे परिवार उपस्थित होते. विशेष कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसले तरी सचिन परब, हसमुख सोलंकी, शारदा मॅडम, अशोक वेलकर आणि अर्चना ताई वेलकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा व आशीर्वाद दिले. शैलु पुजारी, विनोदभाऊ, छोटे उस्ताद वरद वाघमारे, संगीता साकरे, रुची पाटील, निशाताई पाखरे, पूजा वाघमारे, लता सासवडकर, नेहा, पांडुरंग भाऊ, बाबू भाऊ, शरद तावडे, दत्ता वाघमारे, विजय सातपुते, आबा पवार, काफिल अन्सारी, कांतीलाल भाई, मोहन मोरे, डॉ. मंगेश पेडामकर, रामजी दादा, निलेश घाडी, नवनाथ सर आणि दिनेश सोलंकी यानामांकित गायकांनी दिलखुलास गीत गायन करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात औक्षण व केक कापून झाली, उत्तरार्धात स्नेहभोजन झाले आणि शेवटी महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी सर्व उपस्थित व साहाय्यकांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. Post navigation लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवेध पुरस्कारांचे वितरण ! रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मराठा समाजास मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही – मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील