लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवेध पुरस्कारांचे वितरण ! विचारवेध पुरस्कारराचे वितरण करताना डॉ.साठे,कमाने, प्रा.कांबळे व डॉ.कोकाटे. सातारा : बहुजनांनी एकत्र येऊन सत्तापालट केली तरच परिवर्तन होईल.महापुरुषांचा स्वाभिमान जपण्यासाठी प्रथमतः शिक्षण घेतले पाहिजे.अंधश्रद्धेस मूठमाती देऊन प्रगती साधता येईल. असे प्रगिपादन डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी केले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कृती समितीतर्फे परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यासाठी पोवईनाका येथील हॉटेल हेम एक्झिक्युटिव्ह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवेध पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.तेव्हा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते.प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा,छ. शिवराय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.प्रा.सुकुमार कांबळे म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता दिली आहे. त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. बुद्धांनी तर सांगितले होते की, मुला-बाळांना शिक्षण देऊन नीतिमत्तेच्या जोरावर यश खेचुन आणले पाहिजे. त्यालाच स्वर्ग म्हणता येईल. जात ही ‘ऊ’चे घरटे आहे.तेव्हा त्यातून बाहेर पडायचे असेल तर अनिष्ठरूढी व व्यसनाधितांना तिलांजली दिली पाहिजे. महापुरुष वाचले तर आपसुकच परिवर्तन होईल.राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात २१ वसतिगृहाची निर्मिती करून बहुजनांना शिक्षण दिले. भारतरत्न उशिरा का होईना बाबासाहेबांना दिला. इतरांनाही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याबद्धल दिला गेला. अण्णाभाऊंनीचे साहित्य जागतिक स्तरांवर पोहचल्याने आम्ही वर्षोनुवर्षे भारतरत्न मिळावा म्हणून मागणी करीत आहोत. याउलट,५० साहित्याकांची यादी कोण्हीतरी जाहीर केली असून त्यात अण्णाभाऊंचे नाव नाही.अहो, त्यांनी तर दिन- दलीत,कष्टकरी, वंचित-शोषित आदींचे लेखन केले.त्यांनी घोड्याला घोडाच म्हटले म्हणून की काय ?अण्णाभाऊंनी शाहिरीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सांगितले.फकिरा कादंबरी त्यांनी बाबासाहेबांनाच अर्पण केली. मूठभर सत्ताधारी बहुजनांच्या डोळ्यात धूळ फेकून जो कारभार करीत आहेत.त्यांना सुरुंग लावण्यासाठीच आपण एकत्र आले पाहिजे.”बंधुत्व पुरस्कार विजेते डॉ.श्रीमंत कोकाटे म्हणाले, “अण्णाभाऊ रशियात गेले होते.तरी पाठीमागे असणाऱ्या बांधवांना विसरले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ अग्रभागी होते.त्यांच्यामुळेच मुंबई आपणास मिळाली. अठरापगड जाती या मराठा म्हणून कार्यरत आहेत. कोणत्याही भाषेचा कोण्हीही द्वेष करू नये.”उमेश चव्हाण म्हणाले, “बहुजन संघटना एकत्रीत येण्याचा फार्स करतात. मात्र,निवडणुका आल्या की भरकटतात.अजुनही वेळ गेलेली नाही.३ वर्षात एकत्रितपणे येऊन काम केले पाहिजे.” यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवेध पुरस्कार डॉ. कोकाटे,प्रा. कांबळे यांच्यासह बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप तुपे व पालिकेचे सभापती नगरसेवक अशोक शेडगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि.रमेश इंजे, राजर्षी शाहु शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा नरेंद्र पवार,रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमाकांत साठे,रामदास वाघमारे, सुरेश वाघमारे, किरण पवार-कांबळे,श्रीमंत भंडारे, मारुती भोसले,अमर गायकवाड, रघुनाथ बाबर, तरबेज बागवान,रवींद्र बाबर, संदीप जाधव,अनिल खरात, प्रकाश काशीळकर, प्रकाश सावंत, संजय नितनवरे,डॉ. अरुण गाडे,बळीराम जाधव, अमोल बनसोडे, मधुकर आठवले, अनिरुद्ध वीर आदी मान्यवर उपस्थित होते. समितीचे संस्थापक-अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.रावण तथा हृषीकेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.संदीप जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.याकामी, किशोर कांबळे, महेश वायदंडे, संदीप माने, आशिष जाधव, सचिन मोरे, सौ.मनिषा चव्हाण, प्रकाश फरांदे, रीना भोसले, रुपिता पवार, अक्षदा काळे, वैभव गवळी, सुभाष गुंजाळ, धनाजी भोसले, माधुरी भोसले, चमेली पवार, आशिकी गुंजाळ, सविता कणसे, विमल शिंदे,भोसले आदींनी अथक असे परिश्रम घेतले. Post navigation सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याच्या हालचालींना वेग ; १० ते १२ दिवसांत माण नदीत टेंभूचे पाणी दाखल होणार महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात संपन्न!