माणदेशी साहित्यिक नागु विरकर यांना आदर्श ग्रंथपुरस्कारांनी सन्मानीतप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांच्या शुभस्ते हा पुरस्कार गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रधान केला गेला. सातारा वृत्तसेवा…. युवकांनो सावध व्हा! आपल्या आई-वडिलांचे कष्ट आठवा! ग्रंथ जवळ करा, ग्रंथासारखा दुसरा गुरु नाही. असे प्रतिपादन ‘जाणिवांच्या ज्योती’ याविषयावर बोलतांना ज्येष्ठ कवी, प्रवीण दवणे यांनी आदर्श ग्रंथ पुरस्कार २०२६ या पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आवाहन केले. यावेळी कुळगाव – बदलापूर येथील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्यावतीने देण्यात येणारा आदर्श ग्रंथ पुरस्कार २६ चा पेन पब्लिकेशन हाऊस पुणे यांनी केलेल्या मा. नागु विरकर लिखित ‘हेडाम’ या कादंबरीला देण्यात आला आहे.हेडाम कादंबरीला हा 21 वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. लेखक नागु विरकर हे मूळचे म्हसवड ( मसाईवाडी )गावचे माण देशी सुपुत्र आहेत. म्हसवड नगरपरिषद पंचक्रीशीच नावं साहित्याच्या रूपाने महाराष्ट्रभर गाजत आहे. आता म्हसवड शहरला साहित्यिक वारसाही आहे असे अभिमानाने नागरिक बोलत आहेत.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना कादंबरीकार श्री. नागु विरकर यांनी आयुष्यात एक व्यक्ती येतो आणि आयुष्य बदलवून टाकतो. अशा गुरुला २१वा पुरस्कार गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अर्पण करत असून गुरूमुळेच सजनाच्या पंगतीच बसण्याची संधी मिळाली. ते गोंदवल्याचे जालिंदर पोळ गुरुजी यांना गुरु मानतात गुरूनंतर ग्रंथ हेच माझे गुरू आहेत. अशी भावना व्यक्त केली. संघर्ष जेवढा अधिक तेवढा जगन समृद्ध होत.स्वयंप्रकाशित व्हा. जग तुम्हाला शोधत येईल असा मार्मिक उपदेश त्यांनी नवतरुणांना केला.याप्रसंगी आ. वि. प्र. संस्थेचे अध्यक्ष, माननीय श्री जनार्दनजी घोरपडे, महाविद्यालय नियमक मंडळाचे अध्यक्ष, मा. श्री नंदकिशोरजी पातकर, संस्थेचे खजिनदार, रामचंद्र शेटे सहसचिव, राघवेंद्र देशपांडे विश्वस्त तुषारजी आपटे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता, सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचरी साहित्य रसिक प्रवीण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तनया सरदेसाईने तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप भेले यांनी मानले. Post navigation स्कूलबस यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी- संभाजी ब्रिगेडची मागणी पालक-शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधा : मान्यवरांचे प्रतिपादन