पिंपरी चिंचवड हद्दीतील एल.प्रो. शाळा आणि स्कूलबस यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी- संभाजी ब्रिगेडची मागणी


पुणे प्रतिनीधी,
पिंपरी चिंचवड प्रादेशिक कार्यालय (आरटीओ) यांचे नियम मोडून पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर वाहतूक करत आहेत काही ठिकाणी शाळेच्या पार्किंग असूनही शाळा पार्किंग वापरत नाहीत.पालकांच्या आलेल्या गाड्या सर्व रस्त्यावर असतात त्यामुळे शहरातील व स्थानिक रहिवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक आयुक्त यांनी आणि आरटीओ अधिकारी यांनी तात्काळ यांचा बंदोबस्त करावा.कारण ज्या स्कूलबस शाळेच्या आहेत.काही स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांचे बेकायदेशीर वाहतूक करतात नियमाचे पालन केले जात नाही.त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात अनेक स्कूल बस विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहेत.शहरातील हजारो विद्यार्थी रोज शाळेत जाण्यासाठी बस रिक्षा किंवा अन्य वाहनांचा वापर करतात.एल प्रो शाळेच्या एका स्कूलबसमध्ये तब्बल 50 ते 60 आणि 70 विद्यार्थी बसवली जातात.शाळा व स्कूलबस मालक नियमाचे पालन करत नाहीत.विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवर तात्काळ कारवाई करावी.पिंपरी चिंचवड शहरातील एल प्रो शाळेतील स्कूल बसवर अनेक ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत आहेत.यासाठी स्कुल बसचे फिटनेस सर्टिफिकेट,
टॅक्स भरलेला आहे का? ड्रायव्हर लायन्स,ड्रायव्हर बँच बिला,इमर्जन्सी सिलेंडर आहेत का आणि आपल्या परिवाहन(आरटीओ)कार्यलयाकडून एका व्यक्तीच्या नाववर किती परमीट दिली आहेत.याची पण चौकशी करण्यात यावी.अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने करण्यात आली आहे.यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक आयुक्त कार्यालयाने तात्काळ शाळेवर आणि स्कूलबस मालकावर गुन्हा दाखल करावा.कारण शासनाने सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी नियमावली तयार केलेले आहे तरीही शासनाचे नियम आणि आरटीओ कार्यालयाचे नियम मोडून एल प्रो शाळा बेकायदेशीर वाहतूक करत आहे.यासाठी शाळा आणि स्कूल बसवर कारवाई करण्यात यावी. असे निवेदन पिंपरी चिंचवड वाहतूक आयुक्तांत यांना देण्यात आले आहे असे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी सांगितले आहे.
…टिप…1) स्कूल बसला वाहन कंट्रोल
यंत्र बसवावे.
2) स्कूल बसला धोक्याचे इशारा
देणारा अलार्म बसविण्यात यावा.
3) शाळाची ओळख दर्शविणारा
बोर्ड नियमानुसार असावा.
4) स्कूलबसमध्ये सेवक सेविका
नियुक्ती करावी.
5) स्कबस ड्रायव्हर आणि सेवक
यांचे पोलीस व्हेरिफिकेशन
शाळेने जमा घेतले का.
6) स्कूलबसवरच्या सेविका
यांचे पोलीस वेरिफिकेशन
शाळेने जमा करून घेतले आहेत का.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *