म्हसवड, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. सविता वसंत मासाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे, सौ. सोनियाताई गोरे (वहिनीसाहेब),नगराध्यक्षा सौ. पूजाताई विरकर (म्हसवड नगरपरिषद),उपनगराध्यक्ष सौ. श्रीदेवी पिसे , माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, अप्पासाहेब पुकळे,सौ. दिपाली शिंदे, सौ. स्नेहल सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी, अखिल काझी,चैताली शिंदे, प्रमिला ढाले,माजी उपनराध्यक्ष नारायण मासाळ, माणगंगा इंग्लिश मेडीयम स्कुल मासाळवाडी प्राचार्य रावसाहेब मासाळ नगरसेवक महावीर विरकर, नगरसेवक डॉ. सतीश मासाळ ,नगरसेवक अभिशेक वीरकर,सभापती विजय बनगर, नवनाथ मासाळ,माजी नगराध्यक्ष डॉ वसंत मासाळ तसेच परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. सविता मासाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व जिल्हा उपाध्यक्ष या नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन करून भविष्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरण आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सौ. सविता मासाळ यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा जयकुमार गोरे भाऊ व सोनिया गोरे वहिनी सह पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच माजी नागराध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत त्याप्रमाणे मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार,प्रसार, संघटन, विकास कामे करण्याची आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ग्वाही देते असे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *