पुणे:आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, पुणे मुक्कामादरम्यान अलका टॉकीज रोड येथे एका विशेष सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी फलटण येथील मूळ रहिवासी व सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या ध्येयवादी शिक्षिका सौ. शुभांगी शिंदे-फलटणकर यांनी सादर केलेल्या ‘मी साऊ’ या एकपात्री प्रयोगाला उपस्थितांची प्रचंड दाद मिळाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या प्रयोगाने उपस्थितांना भावूक व प्रेरित केले.मान्यवरांच्या हस्ते गौरवप्रयोग संपल्यानंतर उपस्थित असलेल्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी शुभांगी शिंदे यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. राज्याचे माननीय शिक्षण सचिव श्री. सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते शुभांगी शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एका शिक्षिकेने वारीच्या पवित्र वातावरणात स्त्री शिक्षणाचा व सामाजिक क्रांतीचा हा वारसा कलेच्या माध्यमातून जिवंत ठेवल्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.एक सुखद योगायोग: मानसशास्त्राची पुस्तके भेटहा सोहळा शुभांगी शिंदे यांच्यासाठी केवळ सन्मानाचाच नव्हे, तर एका अद्भुत योगायोगाचा ठरला. गेल्या काही महिन्यांपासून त्या मानसशास्त्र (Psychology) या विषयाचा सखोल अभ्यास करत आहेत. नेमकी हीच गोष्ट ओळखून की काय, माननीय शिक्षण सचिवांनी त्यांना ‘पैशाचे मानसशास्त्र’ (The Psychology of Money) हे जगप्रसिद्ध पुस्तक भेट म्हणून दिले.या प्रसंगी भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना अशा पद्धतीचे मार्गदर्शक पुस्तक शिक्षण सचिवांकडून भेट मिळणे, हा एक कमालीचा सुखद अनुभव आहे. हा प्रकार म्हणजे ‘Theory of Therapy’ आणि ‘Law of Attraction’ (आकर्षणाचा सिद्धांत) यांचाच एक भाग आहे, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. या सन्मानामुळे त्यांनी अत्यंत आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.शिक्षिका सौ. शुभांगी शिंदे-फलटणकर यांच्या या कलेचे आणि साहित्याप्रती असलेल्या या आदराचे सर्वत्र अभिनंदन होत असून, शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Post navigation पेन्शन वाढ संदर्भात जावळीतील सेवानिवृत्तीचे श्री. छ. खा. भोसले यांना निवेदन…. वझरे विद्युत उपकेंद्र नावाला, लाईट नाही गांवालागांव व वाड्यावस्त्यांवर भगीरथची वीज द्या नागरिकांची आमदारांकडे मागणी..