▪️ जिल्हात शेतकरी वर्गात मोठी खळबळ
▪️ सुमारे 30ते40लाखाचा बनावट माल जप्त
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज : येथील पेडगाव रस्त्यावरील गोदामात बनावट रासायनीक खते व किटक नाशकांचा सुमारे 30ते40 लाख रुपये किमतीचा मोठा छापा मारून जप्त केला . या बनावट खत व किटकनाशकामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या कारवाई मध्ये सातारा जिल्हा कृषी विभाग , जिल्हा परिषद कृषी विभाग व स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक सातारा ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , श्रीमती भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . ९ रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय भरारी पथक मधील गजानन ननावरे कृषी विकास अधिकारी संजय फडतरे ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक , के के राऊत कृषी अधिकारी गुण नियंत्रण (खटाव तालुका ) , यांच्यासह सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहित फारणे व इतर पोलीस अधिकारी यांनी वडूज ता. खटाव येथे छापा टाकला . वडूज तालुका खटाव येथील काळे यांचे राहते घरासमोरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . काळे यांनी दाखवलेल्या गोदामा मध्ये बनावट रासायनिक खते कीटकनाशक यांचा मोठा
साठा सापडला . अनुदानित रासायनिक खतांचे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे डीएपी (१८ :४६ ) या खताच्या ९० भरलेल्या गोण्या तसेच नाव नसलेल्या सुमारे ३९० कच्चामाल डीएपी खत म्हणून वापरणेच्या उद्देशाने तेथे आढळून आला . तसेच रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश याच्या सुद्धा १५ गोण्या आढळून आल्या . रासायनिक खत बोरिक ऍसिड नॅशनल ऍग्रो हायटेक या कंपनीच्या नावे सुमारे १ मेट्रिक टन ,कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस १० टक्के , दाणेदार कीटकनाशक सुमारे २. ७ मॅट्रिक टन ,तणनाशक ग्लाय फॉसेट ४१ % ,एस एल या तणनाशकाचे सुमारे एक लिटर पॅकिंग मधील ३८० बाटल्या , संशयित तननाशक ग्लायफॉसेट २०० लिटर बॅरल मध्ये आढळून आले . याचा वापर एक लिटर पॅकिंग मध्ये करण्यासाठी येणार होता . उंदीर नाशक झिंक फॉस्फेट सुमारे १२ किलो १० ग्रॅम पॅकेटमध्ये तसेच संशयित कीटकनाशक अल्युमिनियम फॉस्फाईड १० ग्रॅम पॅकेटमध्ये सुमारे २० किलो आढळून आले . त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड तथा जय किसान कंपनीच्या १८ . ४६ व १० : २६ : २६ या खताच्या नवीन छपाई केलेल्या सुमारे १५८० रिकाम्या गोण्या , इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या सुमारे २५० रिकाम्या गोण्या , आणि इफको को-ऑपरेटिव्ह .लिमिटड या कंपनीच्या १८ ४६ या खताच्या सुमारे २०० नवीन छपाई केलेल्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या . असा एकूण एकंदर सुमारे २५ . ५० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
त्या अर्थी अंदाज ३० लाखांचे बनावट खत विकले असल्याचा संशय आहे .
टाकळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी टाकळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील बोगस रासायनिक खतावरील तक्रार दाखल झाल्याच्या अनुषंगाने व मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई करण्यात आली असून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पुढील तपास करीत आहे .
