राऊतवाडी येथे अतिरिक्त वीज डीपीचे उद्घाटन संपन्न! राऊतवाडी-म्हसवड, ता. माण | १० जुलै २०२६. सौ. सोनिया गोरे यांच्या हस्ते उद्घाटन. म्हसवड वार्ताहर … राऊतवाडी परिसरात अनेक दिवसांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा व वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थ, पदाधिकारी व मान्यवरांच्या मागणीनुसार राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अतिरिक्त वीज रोहित्र (डीपी) चे उद्घाटन मा. सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या अतिरिक्त वीज डीपीमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार असून कमी दाबाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येतही मोठी सुधारणा होऊन नागरिकांना अधिक सुरळीत व दर्जेदार वीजसेवा उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास म्हसवड शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन विरकर, उपनगराध्यक्षा सौ. श्रीदेवी निशांत पिसे, माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, सभापती सौ. दिपाली शिंदे, नगरसेविका सौ. सविता वसंत मासाळ, नगरसेवक डॉ. सतीश मासाळ, कु. माधुरी लोखंडे, लखन लोखंडे, अभिषेक विरकर, महेश गायकवाड, विजय जगताप, संजय जगताप, गुलाब जगताप, सुखदेव मासाळ, युवराज काटे, नितीन शिंदे, पडळकर अण्णा, नाना मासाळ, अमोल ठोंबरे, श्रीधर राऊत, महेश लोखंडे तसेच ग्रामस्थ, माता-भगिनी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक?