म्हसवड वृत्तसेवा…पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आणि वृक्षलागवडीला चालना देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या प्रेरनेने व सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरताव, ता. माण येथे सीडबॉल तयार करण्याचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली माती, शेणखत आणि विविध देशी वृक्षांच्या बियांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या परिसरात आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तयार करण्यात आलेले सीडबॉल योग्य वेळी डोंगराळ व मोकळ्या परिसरात विखुरून नैसर्गिक पद्धतीने वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.तसेच या सीड बॉलचे वाटप करण्यात येणार आहे.मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे व उपशिक्षक अनिल पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनीव पालकांनी सहकार्य केले. Post navigation मुरूममध्ये १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव; समाजसेवेच्या कार्याला मिळाली नवी ऊर्जा… माणदेशी भगिनींना किर्तनात डंका…