अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार अंतिम चित्र**

म्हसवड, दि. 18 (महेश कांबळे)
म्हसवड पालिका निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अनेक इच्छुकांनी पालिकेत धाव घेत आपले अर्ज दाखल केल्याने उमेदवारींचा आकडा शंभरी पार गेला होता. मात्र आज झालेल्या छानणीत काही अर्ज बाद झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी तब्बल पाच महिला उमेदवारच रिंगणात कायम राहिल्या आहेत, तर चार महिला उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

छानणी प्रक्रियेत महिलांचे वर्चस्व कायम

म्हसवड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. १७ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशीच इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठीही महिलांनीच मोठी उपस्थिती लावत दोन अंकी आकडा गाठला होता.

आज छानणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी मीनाताई बाबर व सहनिवडणूक अधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत अर्जांची बारकाईने तपासणी करण्यात आली. एकूण ९ महिला इच्छुकांनी भरलेल्या १२ अर्जांची छानणी करण्यात आली.

यामध्ये

सुवर्णा सुनील पोरे,

प्राजकता शुभम पोरे,

जयमाला विशाल विरकर,

कांता शंकर विरकर

या भाजपच्या चार महिला उमेदवारांचे अर्ज पक्षाचे अधिकृत जोडपत्र नसल्याने अवैध ठरवण्यात आले.

रिंगणात पाच महिला उमेदवार कायम

तर खालील ५ महिला उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत:

पुजा सचिन विरकर – भाजप

भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने – राष्ट्रवादी काँग्रेस

रुपाली वाल्मिक सरतापे – बहुजन समाज पक्ष

गौरी विशाल माने – अपक्ष

हिंदमालादेवी राजेमाने – अपक्ष

यामुळे नगराध्यक्ष पदाची प्रतिष्ठेची लढत पाच महिला उमेदवारांत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्ज माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट

अर्ज छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे. त्यानंतरच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे अंतिम चित्र उभे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!