(मुरुम प्रतिनिधी)

कॉमर्स विद्यार्थ्यांंना बॅंकिंग, व्यवस्थापन, आणि अकाउंटिंग विषयात स्पर्धा परीक्षेतून संधी आहे. वर्गात नियमित हजर राहून स्पर्धा परीक्षा तयारी केली तर पदवी पूर्ण करताच नोकरी मिळू शकते, आणि विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी केले. करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षेत बी कॉम आणि एम कॉम मधील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी डॉ अस्वले बोलत होते.
येथील भारत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय कॉमर्स विभागातील बी. काॅम चा विद्यार्थी गणेश जोशी यांनी बँक भरतीसाठी घेतलेली IBPS पूर्व आणि मुख्य परीक्षा यशस्वीरित्या पास केली आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कस्टमर सर्विस असोसिएट या पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच एम कॉम चा विद्यार्थी प्रवीण भोगले याने कर्नाटक राज्य आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची कन्नड अँड कल्चरल डिपार्टमेंट या पदावर पूर्णवेळ सेवेत निवड झाली आहे. यापूर्वी गणेश मुळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वित्त आणि लेखा विभागात निवड झाली आहे.
तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयात प्राचार्य डॉ संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ पी. ए. पीटले, डॉ विनोद देवरकर डॉ अजित आष्टे, राजकुमार सोनवणे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *