कोरेगाव, दि. १४ जून २०२६ : सातारा जिल्हा शिंपी समाजाची त्रैमासिक सभा कोरेगाव येथे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कोरेगाव तालुका अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप धोंगडे यांनी केले.यावेळी पुणे येथील नासप सह सचिव दिगंबर क्षीरसागर हे विशेष पाहुणे उपस्थित होते त्यांनी सर्वांच्या भावना राज्य अध्यक्ष यांचे कानी घालणेचे अभिवचन दिलेसभेमध्ये पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारकासंदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री यांची राज्य कार्यकारिणीने भेट घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला. तसेच शिंपी समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने महामंडळावर इंजि. सुनील पोरे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. राज्य कार्यकारिणीकडून जिल्ह्यातील जुने तसेच दिवंगत सभासदांच्या संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या १० ऑगस्ट रोजी होणारा संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा विशेष उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्याबाबतही सविस्तर उहापोह झाला. सभेचे प्रस्तावित जिल्हा सचिव श्रीकांत फुटाणे यांनी मांडले. चर्चेमध्ये अतुल बारटक्के, प्रमोद बेंद्रे, डॉ. मकरंद पोरे, प्रदीप पोरे, किशोर हिरवे, गजानन लंगडे, मनोज महाडीक आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी इंजि. सुनील पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे नजीकच्या काळात दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोरेगाव येथील समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन संदीप धोंगडे यांनी केले. Post navigation जितेंद्र भिवरे यांचे दुःखद निधन उप मुख्यमंत्र्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी दिल्या सायकली भेट