म्हसवड वार्ताहर …


म्हसवड, ता. 7 जानेवारी 2026 — पंढरपूर–मल्हारपेठ डांबरी रस्त्यावर वरकुटे मलवडी परिसरात झालेल्या मोटारसायकल अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना 6 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता घडली. निवृत्ती दादु यादव यांच्या घराजवळील रस्त्यावर संतोष रघुनाथ पोळ (वय 50, रा. वरकुटे मलवडी) आपल्या पेंशन प्रो मोटारसायकलवर जात असताना समोरून येणाऱ्या होंडा युनिकोर्न (क्र. MH14 HC 4014) मोटारसायकलने जोरदार धडक दिली.
ही मोटारसायकल ऋषीकेश रविंद्र गोंजारी (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) यांच्या ताब्यात होती. त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व अविचाराने वाहन चालविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धडकेत संतोष पोळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी अर्जुन सर्जेराव यादव (वय 49, रा. वरकुटे मलवडी) व आरोपी गोंजारी यांना किरकोळ दुखापती झाल्या. दोन्ही वाहनेही नुकसानीस कारणीभूत ठरली.
फिर्यादी अर्जुन यादव यांच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 13/2026 भादंवि (BNS) कलम 106, 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जी. डी. लुबाळ (मो. 9870091761) करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!