म्हसवड…प्रतिनिधी
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा चौथी फेरी क प्रवर्गामध्ये म्हसवड तालुका माण बस स्थानक म्हसवड यांनी पुणे विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या स्पर्धेचा निकाल समजताच तात्कालीन स्पर्धेच्या वेळी निरीक्षक म्हणून काम केलेले कृषिरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर तसेच प्रवासी मित्र राजेंद्र ढोबळे यांचे हस्ते म्हसवड बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रवीण कुमार कोळी तसेच विश्वास माने यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सी. के. पोरे, वैभव माने, प्रा. वेताळ कोडलकर ॲड. साहिल तांबोळी , माणिक झगडे यादी मान्यवर उपस्थित होते.
बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरता राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित केली होती. तत्कालीन वेळी बस स्थानक परिक्षण विभागीय समितीकडून वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह व्यवस्थापन, चालक वाहक विश्रांती ग्रह, आरक्षण खिडकी,पास विभाग, चौकशी खिडकी, विविध प्रकारचे नोंदणी रजिस्टर, बस स्थानकाच्या बोलक्या भिंती, वृक्षारोपण इत्यादी मुद्द्याला अनुसरून सूक्ष्म निरीक्षण करून गुणदान करण्यात आले होते. पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील एकूण बस स्थानकाच्या स्पर्धेत क प्रवर्गामध्ये म्हसवड बस स्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावून 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. म्हसवड येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कुमार कोळी व विश्वास माने, वैभव माने माणिक झगडे व त्यांच्या सर्व टीमने एकत्रितपणे केलेल्या कामामुळे तसेच दहिवडी येथील आगार प्रमुख कुलदीप डुबल यांच्या मार्गदर्शनामुळे सदर यश मिळाले. कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व राजेंद्र ढोबळे यांनी म्हसवड बस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले. त्या निमित्ताने बस स्थानकातील प्रवासी व उपस्थित मान्यवरांना जिलेबीचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *