म्हसवड (ता. माण | जि. सातारा) — म्हसवड शहरातील सागर बारमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास सागर बारमध्ये फिर्यादी रोहित मनोज बारवासे (वय ३६, व्यवसाय – नगरपालिका सफाई कामगार, रा. क्रांतिसूर्य नगर, म्हसवड) हे उपस्थित असताना किशोर सत्यनारायण लोखंडे व सुरज महादेव लोखंडे (दोघे रा. मल्हार नगर, म्हसवड) यांनी “तू आमच्याकडे का बघतोस?” असे म्हणत वाद घातला.
वाद वाढल्यानंतर किशोर लोखंडे यांनी फिर्यादीचा शर्टचा कॉलर पकडून हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याच वेळी सुरज लोखंडे यांनी टेबलवर ठेवलेला काचेचा ग्लास उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकला. तो ग्लास फिर्यादीच्या डोक्याला लागून गंभीर दुखापत झाली असून डोक्यातून रक्तस्राव झाला.
जखमी फिर्यादींवर धन्वंतरी हॉस्पिटल (डॉ. साबळे) येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर फिर्याद देण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात CR No. 10/2025 अंतर्गत BNS कलम 118(1), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक एन. एन. पळे करत असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!