(अजित जगताप)
महाबळेश्वर दि: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल तथाकथित हिंदुत्ववादी समजणारे काही लोक अवमान करत आहे. त्यांना जाब विचारण्याची क्षमता छत्रपती शिवराय यांच्या वंशजांकडे असूनही ते मौन धारण करतात. त्यामुळे सातारा जिल्हा आर.पी.आय. ने शिवराज्याभिषेक दिन दिनांक ६ जून रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आत्मक्लेष व जबाब दो आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती आरपीआय सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे यांनी दिली आहे.
विश्व पराक्रमी राजे शिवरायांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे
भोसले हे याबाबत व्यक्त होत नाहीत. त्यांनी व्यक्त व्हावे. म्हणून आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, उपाध्यक्ष बबनदादा करडे, संघटक शशिकांत
गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि: ६ जुन रोजी किल्ले प्रतापगडाच्या
पायथ्यापासून असंख्य आर. पी. आय. कार्यकर्ते आत्मक्लेश दीर्घकाळ आंदोलनाला सुरुवातकरणार आहोत. सातारा जिल्हयातील ज्या गावात शिवछत्रपतींचा पुतळा आहे. त्या ठिकाणी मावळे व कार्यकर्ते एकदिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करतील . त्याची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे.
बहुजन समाजाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघाचे भगतसिंह कोश्यारी, खलनायक राहुल सोलापूरकर, सिंघम विचारांचा छिंदम, मनोहर पंत कुलकर्णी तथा भोंदू सनातनी भिडे, अंधश्रद्धा वाहक शास्त्री अशा बहुजन युगपुरुषांच्या विचारांचे शत्रू असलेल्या एका पक्षाचे समर्थक त्यांच्याबद्दल समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. तरीही छत्रपतींचे थेट वंशज याबद्दल मौन धारण करून आहेत. त्यांच्यासाठी आरपीआय ने आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज चा विचारतील त्या दिवशीच हे आत्मक्लेष आंदोलन थांबेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी आरपीआयचे विशाल कांबळे, आशुतोष वाघमोडे, किरण बोभाटे, रेखा सकटे, सुहास मोरे व सातारा जिल्ह्यातील मावळे व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. दरम्यान छत्रपतींचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे नक्कीच जाब विचारतील अशी त्यांनी अशा व्यक्त केली आहे.


. फोटो– छत्रपती उदयनराजे भोसले व आरपीआयचे संजय गाडे व कार्यकर्ते प्रतिकात्मक फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!