(अजित जगताप) वडूज दि: राजकारणामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता हा नेत्याची नाव पैल तीरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. परंतु, राज्याचे ग्रामविकास मंत्री व माण खटाव लोकप्रतिनिधी नामदार जयकुमार गोरे व शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी सामान्य भाजप कार्यकर्ता वडूज नगरीचे सुपुत्र राहुल लोहार याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. या घटनेचे सामान्य कार्यकर्त्यांकडून मनापासून कौतुक होत आहे.मंत्री जयकुमार गोरे हे माण तालुक्यात अपक्ष आमदार म्हणून उभे राहिले होते. तेव्हापासून वडूज नगरीचे सुपुत्र व ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष श्री राहुल लोहार हे त्यांच्या सोबत आहे. मंत्री गोरे यांनी अपक्ष आमदार, त्यानंतर काँग्रेस व आता भाजप असा राजकीय प्रवास केला असला तरी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे श्री राहुल लोहार यांनी कधीही त्यांची पाठराखण सोडली नाही. कोणतीही ठेकेदारी न करता निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज सातारा जिल्ह्यात भाजपचे समर्थक असलेले काही मुठभर कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये श्री राहुल लोहार यांचेही नाव घेतले जात आहे.विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे जरी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांचा संपूर्ण कल आणि भूमिका ही भाजपचे निगडित असल्याने त्यांनीही या सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहून खऱ्या अर्थाने सामान्य भाजपच्या शिलेदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.श्री राहुल लोहार हे समाज माध्यमाच्या पटलावर भाजपची भूमिका मांडत असतात. अनेकदा भाजप पक्षासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सौ सोनिया ताई जयकुमार गोरे व शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे, परिषद सदस्य धनंजय चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, वडूज भाजप तालुका अध्यक्ष अनिल माळी, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, वडूज नगरीचे भाजप नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक- नगरसेविका व मान्यवरांनी श्री राहुल लोहार यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती दिली आहे. सामान्य कार्यकर्ता हा पिलर सारखा पाठीशी उभा असल्यामुळे सत्तेची इमारत दिमाखात उभी असते. सत्ता गेली की काही पिलर स्वतःहून बाजूला जातात. आणि पर्याय शोधतात. परंतु श्री राहुल लोहार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. भूमिकेचा खऱ्या अर्थाने गौरव झाला आहे.अशी प्रतिक्रिया भाजपचे काका बनसोडे, पत्रकार नितीन राऊत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुकाध्यक्ष व श्री लोहार यांचे मित्र कुणाल गडांकुश यांनी दिली आहे. फोटो- मंत्री जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक व वडूज नगरीचे सुपुत्र श्री लोहार यांना शुभेच्छा देताना मान्यवर (छाया- अजित जगताप, वडूज) Post navigation गुन्हे अन्वेषण करताना जात धर्माचा विचार करता कामा नये-प्रा.किरण सगर अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके