(मुरुम प्रतिनिधी)

गुन्ह्याचा तपास करत असताना जात धर्म पंथाचा विचार मनात येऊ नये असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर यांनी मांडले.विमलाई फाउंडेशनच्या वतीने मेरीट मेसर्स कोचिंग क्लासेसच्या सभागृहात पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दिलिप सगर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलन पुदाले हे होते.मंचावर जेष्ठ समाजसेविका सविता सगर, सुप्रिया सगर,भागवत सगर ,दिलिप सगर, अंजली सगर,माणिकवार, महेश जाधव,मिरा सगर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा सगर म्हणाले की; पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना अन्यायग्रस्त उपेक्षित वंचित घटक नजरेसमोर ठेवून योग्य पध्दतीने भुमिका घ्यावी.कर्तव्य बजावतानां भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून कार्य करावे.कुठल्याही कसल्याही आमिषाला बळी न पडता भलाईने आणि सचोटीने प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे आपले पद व त्याची प्रतिष्ठा सांभाळून कार्य करीत रहावे असे त्यांनी सांगितले.सुप्रिया सगर हिने परिस्थितीवर मात करत, घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळून चिंचकोट (ता. उमरगा) येथील सुप्रिया दिलीप सगर यांनी ‘एमपीएससी’ (MPSC) परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली.असे प्रास्ताविकात विजय सगर यांनी माहिती दिली. त्यांच्या या यशाबद्दल ‘कै. विमलाई श्रीमंतराव सगर सोशल फाउंडेशन’च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुप्रिया सगर या सध्या नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात सेवेत कार्यरत आहेत.सुप्रिया सगर यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले असून, त्यांनी उमरगा येथील श्रमजीवी कॉलेजमधून बी.एस्सी. (B.Sc.) पदवी पूर्ण केली. एका शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन्ही लहान बहिणी देखील सध्या महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावत आहेत. या सत्कार समारंभात सुप्रिया यांच्यासह त्यांच्या माता-पिता व पती भागवत सगर यांचाही गौरव करण्यात आला.परिस्थिती कधीच अडचण बनू शकत नाही – PSI सुप्रिया सगरसत्काराला उत्तर देताना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सगर भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “कोणतेही ध्येय गाठताना परिस्थिती कधीच अडचण बनू शकत नाही. मनात चिकाटी, निश्चित ध्येय आणि अभ्यासात सातत्य असेल तर यश नक्की मिळते. मी स्वतः लहान मूल असताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून हे यश मिळवले आहे.”मातोश्रींच्या सविताआई सगर यांच्या सह सत्कार करताना प्रा.सगर यांनी सत्कार मुर्ती सुप्रियास सगर यांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ आणि संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित ‘भारताचे संविधान’ हे भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय सगर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वाती वाडीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. ज्ञानेश्वर माणिकवार सर यांनी मानले. या सोहळ्याला क्लासेसचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!