नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा शिक्षक बॅंकेच्या वतीने सत्कार

म्हसवड – सुशिल त्रिगुणे . ….

प्राथमिक शिक्षक बँक सातारा शाखा म्हसवड शिक्षक समितीचे वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष नगराध्यक्ष पूजा सचिन विरकर व नगरसेविका चैताली अनिल शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक तथा माजी व्हाईस चेअरमन विजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून म्हसवडच्या नगराध्यक्ष पूजा विरकर यांचा व त्यांचे पती सचिन विरकर ,चैताली
शिंदे यांचा त्यांनी नगरपालिका म्हसवड निवडणूकित मोठे मताधिक्य मिळवून यश मिळवले त्याबद्दल संचालक विजय बनसोडे यांच्या हस्ते पूजा विरकर यांचासपत्नीक सत्कार करण्यात आला .यावेळी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कार्यक्रमचे प्रास्ताविकात सुशील त्रिगुणे यांनी सांगितले की नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेचशालेय बहुतेक सुविधांसाठी प्रयत्न करावेत तसेच शिक्षकांच्या शालेय अडचणी सोडाव्यात असे सांगून बँकेच्या ठेवी व इतर कामकाजाबाबत माहिती दिली .राकेश ओतारीयांनी नगराध्यक्ष यांना शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केले तसेच नवनाथ सावंत यांनी शालेय नगरपालिका नगरपालिका हद्दीतील सर्वांच्या समस्या मांडल्या व त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे असे विनंती अशीविनंती केली. कार्यक्रमासाठी बाळासाहेब बाळासाहेब अडसर हिरामण चव्हाण यासह अनेक शिक्षक उपस्थित होते कराड पाटण सोसायटीचे व्हाईस चेअरमन एमडी दडस यांनी आपल्या मनोगतात नगराध्यक्षांचे गौरव केला व शिक्षणाप्रती आदर भरणा व्यक्त केले व अध्यक्षांचा सत्कार केला शेवटी अध्यक्ष व नगरसेवक व सर्व शिक्षकांच्या वतीने बँकेने काढलेला कॅलेंडरचे उद्घाटन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर शेंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *