आंबेनळी घाटातील अपघाताने साताऱ्यातील आठ जण ठार

पोलादपूर ( अजित जगताप)दि: आसनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आठ युवक सहलीसाठी गेले होते. यावेळी रविवारी दिनांक 24 मे रोजी रात्री त्यांच्या स्कार्पिओ गाडीचा अपघात झाला. ही गाडी दरीत कोसळलेले या गाडीतील आठ तरुण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सदरचा अपघात हा मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये झालेला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच रायगड व सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन महाबळेश्वर ट्रॅकर, प्रतापगड रेस्क्यू टीम , रायगड जिल्ह्यातील महाड – पोलादपूर येथील ट्रॅकर संस्था व नागरिक रात्री पासून मदत कार्य करीत आहेत. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा मदत कार्याला गती आली.
या अपघातात सातारा जिल्ह्यातील
महेश अनिल पवार वय २५
वर्ष,आदित्य अशोक साळुंखे वय- २१ वर्ष, रितेश राजेंद्र लोखंडे वय -२५ वर्षे ,सुहास जितेंद्र लोखंडे- २० वर्षे,अंश समीर चव्हाण वय- १८ वर्ष ,उत्कर्ष आनंद शिंगटे वय- २१ वर्षे, अनिल अभिमन्यू शिंगटे वय- २५वर्ष ,नितीन किसन नायकोंडे वय- ३५ वर्ष अशी आहेत. स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच ११डी एन २३४० या गाडीने ते प्रवास करत होते. सदरची घटना समजताच सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. यातील एका तरुणाचा काल वाढदिवस असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!