(मुरुम प्रतिनिधी) केशेगाव ता तुळजापूर येथील प्रसिद्ध युवा उद्योजक, समाजसेवक आणि धाराशिव जिल्हा बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी संयोजक श्री. पंडित जळकोटे यांना सोलापूर मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा मंडळ यांच्या वतीने या वर्षाचा मानाचा ‘बसवरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. सोलापूरचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमारजी गोरे यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पंडित जळकोटे यांनी उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला आहे.श्री. पंडित जळकोटे यांनी केवळ व्यावसायिक क्षेत्रातच आपली ओळख निर्माण केली नसून, गोरगरीब, गरजू आणि समाज घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. धाराशिव जिल्हा बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे संयोजक म्हणून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला मोठी गती दिली आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे कार्य आणि समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार त्यांच्या याच अविरत सेवाभावाचा आणि समाजकार्याचा गौरव करणारा ठरला आहे.पंडित जळकोटे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “पंडित जळकोटे यांच्या रूपाने एका खऱ्या समाजसेवकाचा आणि कर्तृत्ववान युवा उद्योजकाचा योग्य सन्मान झाला आहे. Post navigation पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ढोले भगिनींचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने सत्कार.