(अजित जगताप)भुईंज दि: देशातील शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर तो उर्जा दाता ही आहे. शेतकऱ्यांनी इंधन दाता होणे. अत्यंत महत्त्वाचे आहे.२००४ सालापासून नॉलेज ऑफ द पावर याप्रमाणे देशातील अन्न उत्पादना सोबतच इथेनॉल निर्मिती करणारा शेतकरी हा ऊर्जादाता झाला पाहिजे .अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भुईंज येथे केले. स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मंत्री गडकरी आले होते. या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब वीर हे राष्ट्रभक्त आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी तळमळकारी नेतृत्व होते. त्यांच्यासारख्या सैनिकांच्या रक्त सोडल्यामुळे परिश्रमाने इतिहास लिहिला गेला आहे. महाराष्ट्रात आर्थिक विकासाला हातभार लावण्यामध्ये सहकारी चळवळीचे मोठे योगदान आहे. समाजभिमुख- विकासाभिमुख नेतृत्व नसेल तर सहकारी कारखाने संपुष्टात येतात. पश्चिम महाराष्ट्र मध्ये अनंतराव गाडगीळ, विखे- पाटील यांनी सहकार चळवळ रुजवली. तेवढे विदर्भात यश मिळाले नाही. आबासाहेब वीर यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे. असे स्पष्ट करून मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रात चालवणे हे मेरीट आहे. तर विदर्भात 33% पास झालेल्यांची शाळा काढण्यासारखाच सहकारात प्रकार आहे. मी चार कारखाने चालवतो परंतु सिंचनाचा अभाव होऊ दिला नाही. शेतकऱ्यांसाठी काम करावे. असे मी ठरवले आणि खडकावर डोकं आपटण्याचा प्रयत्न सुरू केला. सध्या साखर गोड नाही. कडू होत चाललेली आहे. ब्राझीलला तीन वेळा गेलो त्यावेळेला माझ्यासमवेत खासदार लक्ष्मण पाटील होते. त्यांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते .ब्राझीलला साखर निर्मितीचे मूल्य 25 ते 26 रुपये आहे तेच हिंदुस्थानात 32 ते 33 रुपये आहे. साखर कारखानदारीतून साखरेतून मुनाफा मिळवणे अडचणीची गोष्ट आहे. कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे. गहू स्वस्त ब्रेड महाग आहे .अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध उपाय योजना राबवली पाहिजे. असे ही त्यांनी स्पष्ट केले इथेनॉल आता जगामध्ये मागणी वाढली आहे. . सध्या वाहनांमध्ये इथेनॉल चा वापर केला जात आहे. दोन हजार कोटी लिटर उत्पादन क्षमता असून आता टोयाटो कंपनीने इथेनॉल वर चालणारी वाहने तयार केलेले आहेत भविष्यात १००टक्के इथेनॉल वर गाड्या धावणार आहेत. इथेनॉल पंप सुरू होणार असून कारखान्यानेही तसे पंप टाकावेत. अशी त्यांनी सूचना केली. सध्या डांबरामध्ये सुद्धा प्लास्टिक, कचरा, टायर टाकून रस्ता मजबूत केला जात आहे. तशाच पद्धतीने हायड्रोजन याचाही वापर होणार आहे . भविष्यात चांगले रस्ते तयार करून लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे .शेतकऱ्यांनी आता पावसाचे पाणी जमिनीत मुरवले पाहिजे. सरकारी नोकर पगारातून बचत करून सेवानिवृत्तीनंतर व्याज मिळवतो. तशा पद्धतीने पाण्याबाबतही तसाच निर्णय घेतला पाहिजे. पाणी हे भविष्य आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. तलावातील गाळ काढला पाहिजे. रोडवर त्याची माती टाकली तर रोड आणखीन मजबूत होतो. पुणे- सातारा रस्त्याच्या कामांबाबत बाबत मी क्षमा मागतो. कारण , गैरसोयीने या कामाचा कंत्राटदार दिसला तर त्याला तिथेच ठोका असे त्यांनी सल्ला दिला. मी लक्ष्मी दर्शन घेत नाही. अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे असे त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी विधान परिषद सभापती ज्येष्ठ आ. राम राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आबासाहेब वीर पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात आला. या वेळेला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसहराजे भोसले व खासदार श्री छ उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, कारखान्याचे चेअरमन प्रमोद शिंदे, प्रभाकर घार्गे ,बाळासाहेब सोळस्कर पाटील, अँड.उदयसिंह उंडाळकर- पाटील, बाबासाहेब कदम, हनुमंतराव चवरे, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे ,शिवाजी जमदाडे, किरण काळोखे, सचिन जाधव, रामदास इथापे, ललित मुळीक, प्रकाश धुरगुडे ,संजय फाळके, संजय कांबळे, जितेंद्र रणवरे, अनंत तांबे व सर्व कारखान्याचे संचालक तसेच संदीप चव्हाण, सुनील माने, बकाजीराव पाटील, शामराव गाढवे, प्रतापराव पवार ,शिवाजी महाडिक, उदय कबुले , श्रीकांत किसन वीर ,महादेव मस्कर, कांतीलाल भोसले, राजेश विलासराव पाटील, सतीश परामणे, सदाशिवराव सपकाळ, सत्यजित सुरेश वीर, रवींद्र परामणे, विक्रांत डोंगरे, मनोज पवार, राजेंद्र राजपुरे, मोहन जाधव , बी आर सावंत, राहुल डेरे, सचिन अनपट, राजेश निंबाळकर, विजय जगताप, मेलविन डिमेलो, निनाद जगताप, महेश चव्हाण, संजय कारंडे, विश्वास शेडगे, तन्मय पाटील, अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष विरहित शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन केल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखवला होता. राजकारण विरहित या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने परिवर्तनाची मोळी पेटली आहे.—– ——————————————- – फोटो — आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्वीकारताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ मार्गदर्शक रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले खा. श्री छ भोसले, खा.नितीन पाटील, प्रमोद शिंदे व मान्यवर (छाया- निनाद जगताप सातारा) Post navigation पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर म्हसवड पोलिसांची कर्णकर्कश आवाजाच्या मोटारसायकलींवर धडक कारवाई.