भरधाव ट्रक चालकाला एक वर्ष सश्रम कारावासऔंध न्यायालयाचा निकाल; दोन युवकांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षागोंदवले वृत्तसेवा : पूसेसावळी ते औंध मार्गावरील संभाजीनगर येथे २०१६ मध्ये झालेल्या भीषण अपघात प्रकरणी भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाला औंध येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास व १३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल मा. न्यायमूर्ती दर्यावर्दी साहेब यांनी शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी दिला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०१६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पूसेसावळी ते औंध डांबरी रस्त्यावर संभाजीनगर परिसरात हा अपघात घडला होता. आरोपी प्रवीण शिवाजी निकाळजे (वय २९, रा. कोर्टी, ता. कराड, जि. सातारा) हा मालवाहक ट्रक (क्र. MH-11-AL-702) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत औंधच्या दिशेने जात होता. यावेळी समोरून चाललेल्या नवीन पल्सर मोटारसायकलला त्याने पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात मोटारसायकल चालक प्रफुल्लकुमार सुरेश भोसले तसेच पाठीमागे बसलेले जयदीप जनार्दन भोसले हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता ट्रकसह पसार झाला होता. जखमींना तातडीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान प्रफुल्लकुमार भोसले यांचा दि. १७ मे २०१६ रोजी मृत्यू झाला, तर जयदीप भोसले यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी फिर्यादी शंकर भरत भोसले (रा. नागझरी, ता. कोरेगाव) यांनी औंध पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर C.R. No. 47/2016 अन्वये भारतीय दंड विधान कलम 279, 304(A), 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134(a)(b) सह 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीस दि. २५ मे २०१६ रोजी अटक करण्यात आली होती.या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. आर. अतिग्रे यांनी केला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील प्रकाश विजय जोशी यांनी काम पाहिले.न्यायालयाने आरोपीस IPC कलम 304(A) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, तसेच इतर कलमान्वये स्वतंत्र शिक्षा व दंड सुनावला. सर्व शिक्षा एकत्रित चालणार असून अंतिम शिक्षा एक वर्ष सश्रम कारावास व १३ हजार रुपये दंड अशी ठोठावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतून प्रत्येकी ५ हजार रुपये मयतांच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.या खटल्याचे कामकाज औंध पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ए. ए. शिंदे (PC 206) यांनी पाहिले. Post navigation श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचा तुळजापुर येथील कँपमध्ये डंका ज्ञान गंगेचे भागीरथ, प्रा.विश्वभंर बाबर