राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट लातूर यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील ग्रामिण साहित्यिक म्हणून हेडाम या बहुचर्चीत कादंबरी बरोबरच विविध साहित्यिक लेखक,कथाकथनातून समाज प्रबोधन या उल्लेखनिय कार्याची दखल घेत राज्य पुरस्कार जाहीर झाल्याचे ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मधुकर सलगरे सर यांनी जाहीर केले आहेत. गेल्या् 24 वर्षांपासून या ट्रस्ट च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी नागू विरकर बरोबरच डॉ लक्षिमन शिवनेकर.. मुबंई,डॉ हमीद चौधरी.. लातूर, मा.प्रवीण देशमुख.. नांदेड, डॉ. हनुमंतराव किनिकर,.. लातूर, डॉ. अशोकराव नारनवरे.. शा. औराद,अमोल पांढरे, मा..संभाजी सूळ आदि मान्यवरांना जाहीर झाले आहेत.सदर पुरस्कार वितरण लातूरचे खासदार मा डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते 24 मे 2026रोजी मोठया भव्य कार्यक्रमात होणार आहे..असे ट्रस्टचे अध्यक्ष म्हणाले.नागू विरकर यांचा हा साहित्य क्षेत्रातील 20 वा पुररस्कार असून हेडाम कादंबरी ला वाचक वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभत आहे म्हणूनच तीन वर्षात सहावी वि आवृत्ती प्रकाशीत होत आहे..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठ सोलापूरला बी. ए. भाग 2 च्या अभासक्रमात तिचा समावेश झाला आहे.या पुरस्काराने नागू विरकर आनंदित झाले असून बालपण घोड्यावर बसून मेंढारामाघे जया लातूर भागातील ग्रामिण भागात फिरत होतो तेथेच आज पुरस्कार मिळतो आहे.. एके काळी एक मेंढक्याचे पोर म्हणून ज्या भूमीत ओळख होती त्याच भूमीत ग्रामिण साहित्यिक म्हणून पुरस्कार मिळनं हीं माझ्यासाठी खुप मोठी बाब आहे. लातूर भटकंती केलेला परिसर आणि तेथील शेतकरी जीवनाचा मी कादंबरीत उल्लेख करुन सामाजिक जीवन चित्रित केले आहे. त्याची जाणीव डॉ सलगरे सरांनी घेतल्या बद्दल आभार व्यक्त केले.हा पुरस्कार जाहीर होताच वीरकरांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे Post navigation आत्मगिरी विद्यालयाचा १० वी निकाल १००%. स्वरांजली ढोले केंद्रात दुसरी कृष्णा भांबुरे यांचे यश, 100 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण